Pujara ()
लंडन, १४ ऑक्टोबर, (हिं.स.) : चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीने प्रभावित इंग्लिश काउंटी संघ डर्बीशर पुढीलवर्षी या फलंदाजासोबत करार करू इच्छित आहे. मात्र, आयपीएल आणि बांगलादेश दौ-यामुळे त्याच्या समस्या वाढल्या आहेत.
पुजारा स्पर्धेच्या अखेरच्या आठवड्यात डर्बीशरसाठी खेळला आणि अखेरच्या तीन सामन्यात ५४.७५ च्या सरासरीने २१९ धावा केल्या. डर्बीशरच्या एलीट परफॉर्मेंस संचालक ग्रीम वेल्श यांनी सांगितले की, काउंटी २०१५ साठी पुजारासोबत बातचीत सुरु आहे.
त्यांनी सांगितले की, आम्ही पुजारासोबत बोललो आहोत आणि त्याला पुनरागमन करायचे आहे. तो संघात चांगला रूळला होता आणि त्याला आमच्यासाठी खेळून चांगले वाटत होते. त्यांनी पुढे सांगितले की, त्याला इंग्लंडच्या परिस्थितीला स्वत: पडताळायचे आहे आणि हा त्याच्यासाठी सर्वोत्तम पर्याय देखील आहे.